ब्रेकिंग

विधानसभा अध्यक्षांची निवड बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडी टाकणार ही चाल

मुंबई-विधानसभा अध्यक्षांची निवड बिनविरोध व्हावी, यासाठी विरोधी पक्ष भाजपने सहकार्य केले तर भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन याच अधिवेशनात मागे घेतले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.आवाजी मतदानाने अध्यक्षांची निवडणूक घेण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली आहे.

महाविकास आघाडी सरकारकडे १७० आमदारांचे बहुमत आहे. त्यामुळे अध्यक्षांची निवड करण्यात आता कोणतीही अडचण नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र अध्यक्षपदासाठी आमचा उमेदवार राहील, असे सांगून निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत.

तथापि, भाजपने उमेदवार देऊ नये आणि निवडणूक बिनविरोध करावी आणि त्या बदल्यात भाजपच्या १२ सदस्यांचे निलंबन मागे घेतले जावे, असा प्रस्ताव असल्याची आणि त्यावर दोन्ही बाजूंच्या नेत्यांची प्राथमिक चर्चा झाली असल्याचे कळते आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!