महाराष्ट्रमुंबई

“गोंदियातील अपघाताची घटना दुर्दैवी”, झटपट मतदकार्य राबवण्याचे निर्देश – फडणवीस

मुंबई : भंडारा-गोंदिया शिवशाही बसला गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी गावाजवळ शिवशाही बसला आज, शुक्रवारी भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 10 प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून सुमारे 35 जण जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनीनजीक झालेला शिवशाही बसचा अपघात अतिशय दुर्दैवी असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे. गरज भासल्यास जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्याची सूचनाही त्यांनी केलीय. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, ते मदतकार्यासाठी समन्वय करीत आहेत. या घटनेतील जखमींना लवकर आराम पडावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

सोबतच आवश्यकता भासली तर जखमींना उपचारासाठी नागपूरला स्थानांतरित करा असे फडणवीस यांनी नमूद केले आहे. यासंदर्भात ट्विटरव (एक्स) जारी केलेल्या संदेशात फडणवीस म्हणाले की, सदर बस अपघात अतिशय दुर्दैवी असून मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहवेदना व्यक्त करतो. तसेच अपघातातील जखमींवर तातडीने योग्य उपचार मिळावे यासाठी गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. फडणवीस यांनी मृतकांच्या कुटुंबियांबद्दल सांत्वना व्यक्त करत जखमींना तत्काळ उपचार मिळावे याचे निर्देश दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!