महाराष्ट्रमुंबईराजकीय

मालवणी महोत्सवाला उत्साहात प्रारंभ ; संभ्रम दूर करुन भगवा फडविण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार

गंगाराम गवाणकर यांना वाहिली आदरांजली

मुंबई : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, राजकीय विश्लेषक श्री विजय वैद्य यांच्या पुढाकाराने जय महाराष्ट्र नगर बोरीवली पूर्व येथील कै. अनंतराव भोसले मैदानावर २८ वर्षांपूर्वी सुरु करण्यात आलेल्या मालवणी महोत्सवाचा यंदाच्या वर्षी उत्साहात प्रारंभ झाला. अवेळी आलेल्या पावसामुळे पहिल्या दिवशी मैदानावर मोठ्या प्रमाणावर चिखल झाला. परंतु याही परिस्थितीत कार्यकर्त्यांनी कंबर कसून त्यावर मात केली आणि मालवणी महोत्सवास प्रचंड उत्साहात प्रारंभ केला. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक कै. विजय वैद्य यांच्या नांवाने उभारण्यात आलेल्या रंगमंचावर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी आणि मार्मिक चे स्तंभलेखक योगेंद्र ठाकूर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या महोत्सवाला सुरुवात केली.

मराठी आणि मालवणी नाट्यसृष्टीवर आपला अमीट ठसा उमटविणारे ज्येष्ठ नाट्यलेखक गंगाराम गवाणकर यांना काल याच महोत्सवात आदरांजली वाहण्यात आली. उत्सव प्रमुख, मागाठाणे मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार मोरे, सचिव वसंत सावंत, माजी शाखाप्रमुख अशोक परब, सुभाष देसाई, हेमंत पाटकर, सुहास पाटकर, रोहिणी चौगुले, स्मिता डेरे, मंगेश डेरे, नंदकिशोर शिवलकर, मनोज सनान्से, अमित सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. सत्ताधारी महायुतीच्या नेते आणि कार्यकर्त्यांकडून पद्धतशीरपणे पसरविण्यात येत असलेला संभ्रम लोकांमधून दूर करुन माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची ज्वलंत हिंदुत्वाची मशाल धगधगत ठेवून शिवसेनेचा निखळ शुद्ध भगवा सर्वत्र फडकविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील पेंडूर गाव येथील श्री देव वेताळाला गाऱ्हाणे घालण्यात आले. योगेश त्रिवेदी आणि योगेंद्र ठाकूर आणि कार्यकर्ते यांनी देव वेताळ यांच्या मंदिरातून निघालेल्या पालखीला खांदा दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!