तब्बल १४ वर्षापासून जेवण न करता जगलेला अवलिया,खाद्य म्हणून खातो फक्त..

सोलापूर – एखादा माणूस अन्नाविना किती दिवस जगू शकतो? तर त्याचे उत्तर आहे, २१ दिवस. प्रत्येक माणसांचे शरीर ६० टक्के पाण्याने भरलेले आहे.त्यामध्ये माणसाला अन्नाचीही नितांत गरज असते. मात्र,गेल्या १४ वर्षांपासून जेवण न करता फक्त शेंगदाणे आणि गुळ खाणारा अवलिया सोलापूर जिल्ह्यात आहे. सोलापूर जिल्ह्यातील वडाचीवाडी मधील नागनाथ गोरे असं या अवलियाचे नाव आहे.हा अवलिया खानदानी शेतकरी आहे.
शरीर संपदा निरोगी राखण्यासाठी आणि आरोग्यदायी श्रेष्ठ पौष्टिक आहार म्हणून गुळ-शेंगदाणे खात असल्याचे गोरे सांगतात.पेशाने शेतकरी असलेले नागनाथ गोरे केवळ शेंगदाणे आणि गुळ इतकंच खातात. वयाच्या ४८ वर्षापासून ते आजतागायत ६२ व्या वर्षी देखील ते शेंगदाणे गुळ खातायेत. एकेदिवशी गोरे घरात बसले असताना त्यांनी शेंगदाणे गुळ सहज एकदा खाल्ले आणि त्यांना याची सवयच लागली.
ती पुढे तशीच आजही कायम राहिली आहे. ते गोरे गावच्या ग्रामपंचायतचे सदस्य देखील राहिले आहेत. केवळ घरीच नव्हे तर बाहेर लग्न समारंभ असोत की अन्य कार्यक्रम, गोरे हरएक कार्यक्रमाला हजेरी लावतात.मात्र, तिथे ते पाणी देखील पित नाहीत.
गोरे शेंगदाणे गुळ इतकच खात असल्याचे अनेकांना माहिती झाले असल्याने गावातील लोक असोत की जवळचे नातेवाईक, त्यांना कुणीही जेवायचा आग्रह धरीत नाहीत.ते त्यांना एका प्लेटमध्ये शेंगदाणे गुळ आणुन देतात.गावातच ते एक मुलगा,सुन,एक नातु यांच्या समवेत कुडाच्या घरात राहतात.अन्न न खाणाऱ्या नागनाथ गोरेंची आता सर्वत्र चर्चा होऊ लागली असून अनेक जणांना याबाबत कुतूहल निर्माण झालं आहे.