
मुंबई दि.28 (प्रतिनिधी) घाटकोपर ते दादर अंतर कापायला अवघी 10 मिनिटे लागतात. परंतू कोकणातून आलेल्या मांडवी एक्सप्रेसला ते अंतर कापायला पाऊण तास लागल्याने चाकरमानी अक्षरशः वैतागले.हा प्रकार शुक्रवारी 26 मे रोजी रात्री घडला.
मांडवीला थांबवून परराज्यातील ट्रेन पुढे काढल्याने मांडवी एक्सप्रेस मधील प्रवाशांना ताटकळत राहण्याची वेळ आल्याची माहिती प्रवाशांनी दिली.
या बाबत प्रवाशांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की शुक्रवारी सकाळी 10104 मांडवी एक्सप्रेस कोकणातून निघाली होती.त्यानंतरचा प्रवास वेळेवर होत होता.पुढे घाटकोपर पर्यंत ट्रेन आली तेव्हा ती अवघ्या 10 मिनिटात दादरला पोचू शकली असती.
परंतू मांडवी ट्रेनला घाटकोपर येथे उभे करून मागे सारत बाहेर गावच्या ट्रेनना पुढे काढले गेले.त्यामुळे मांडवी एक्सप्रेस घाटकोपर दरम्यान पाऊण तास रखडली.तिला सिग्नल मिळाले नाही.तिचा पुढचा प्रवास कासव गतीने झाला.या वेळी सामान घेऊन उभे असलेले चाकरमानी फारच वैतागले होते.
रोहा ते मुंबई भागातील ट्रेन ऑपरेटींगची जबाबदारी ही मध्य रेल्वेकडे आहे. मध्य रेल्वेच्या आगाऊ पणा बाबत प्रवाशांत संताप ऐकायला मिळत आहे. प्रवासात दमलेले थकलेले चाकरमानी या वेळी संतप्त झाले होते.मुंबई ही आमची आहे.कोकणी माणसाने रक्त सांडवून मुंबई मिळवली आहे.परराज्यातील मागच्या ट्रेनना पुढे काढून मध्य रेर्ल्वे आमच्यावर अन्याय करीत आहे.हा आजचाच प्रकार नाही असा आरोप प्रवाशांनी केला.या विरोधात आंदोलन छेडावं लागेलं असा इशारा प्रवाशांनी दिला आहे.