मंत्रालय

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण..

मुंबई, दि. १९ : मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सन २०२० च्या जीवनगौरव आणि राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराचे वितरण उद्या मंगळवारी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत राजभवन येथे होणार आहे.

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्यावतीने दरवर्षी पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा जीवनगौरव तसेच उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मान केला जातो. २०२० सालचा कृ.पां.सामक जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार श्री. प्रकाश बाळ जोशी यांना जाहीर झाला आहे. राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (इलेक्ट्रॉनिक माध्यम) श्री. सिद्धार्थ गोदाम- न्यूज १८ लोकमत
( औरंगाबाद), राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (वृत्तपत्र) श्री. किरण तारे – इंडिया टुडे तर मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ सदस्यांकरिताचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार श्री. चंदन शिरवाळे – दै.पुढारी यांना जाहीर झाला आहे. यंदाच्या या पुरस्कारांचे वितरण राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्या दिनांक २० जुलै रोजी सकाळी ११:३० वाजता राजभवन येथे होणार आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कु. आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री, (माहिती व जनसंपर्क, पर्यटन, राजशिष्टाचार), तर विशेष अतिथी म्हणून  श्री.भारतकुमार राऊत, माजी खासदार (राज्यसभा), श्री. दिलीप पांढरपट्टे (महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय) हे उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार निवड समितीचे प्रमुख म्हणून प्रकाश सावंत, सदस्य इंद्रकुमार जैन व सदस्य सचिव म्हणून सचिन गडहिरे यांनी काम पाहिले असल्याची माहिती मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघांचे अध्यक्ष मंदार पारकर आणि कार्यवाह प्रमोद डोईफोडे यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!