महाराष्ट्रक्राइममुंबई

गोरेगावच्या फिल्मसिटीजवळ नागरमोडी पाड्यात झोपड्यांना भीषण आग, मोठे नुकसान

ताडाच्या 150 झोपड्या जळून खाक; शेकडो नागरिक बेघर

मुंबई: गोरेगाव फिल्मसिटी शेजारी नागरमोडी पाड्यातील आंबेवाडी परिसरात भीषण आग लागण्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडे सातच्या दरम्यान घडली. या घटनेत जवळपास १०० ते १५० कच्चा ताडपत्रीच्या झोपड्या आगीच्या भक्षस्थानी आल्या.

फिल्म सिटीजवळच नागरमोडी पाड्यात असलेल्या आंबेवाडीत दीडशे लोकांची झोपडपट्टी आहे. एका झोपडी जवळ शॉर्टसर्किटमुळे आग लागली. काही वेळात आग इतर झोपड्यांना पसरून झोपड्या जळून खाक झाल्या. यावेळी घरातील ४ सिलेंडरचा स्फोट होऊन आग अधिकच भडकली. तत्काळ आगीच्या माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० ते १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलामार्फत युद्ध पातळीवर प्रयत्न रात्री उशीरापर्यंत सुरू होते. या परिसरात मोकळ्या जा-गेवर शेकडो ताडपत्रीच्या झोपड्या बांधण्यात आल्या होत्या. फिल्म सिटी प्रशासनाच्या आशीर्वादाने या मोकळ्या जागेवर मोठ्या प्रमाणात

गोडाऊन आणि घर अनधिकृतपणे बांधण्यात आली होती. मात्र गुरुवारी शॉर्टसर्किटमुळे सर्व घरे आणि गोडाऊन जळून खाक झाले. महापालिका प्रशासनाच्या वतीने पीडित नागरिकांना गोकुळधाम महापालिका शाळेत राहण्याची व्यवस्था व इतर सुविधा पुरवण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!