ब्रेकिंग
मुंबईतल्या या महाविद्यालयानेही घातली हिजाबवर बंदी,वाद तापण्याची शक्यता

मुंबई:- कर्नाटकात हिजाब वाद पेटत असताना मुंबईतील माटुंगा येथील एमपी शाह महाविद्यालयानेही विद्यार्थ्यांनींना बुरखा,स्कार्फ तसेच डोक्यावर घुंघट घालण्यास बंदी घातली आहे.या बाबतची अधिकृत माहिती महाविद्यालयाने आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे.तसंच पत्रक देखील या महाविद्यालयाने प्रसिद्ध केलं आहे.
या प्रसिध्दी पत्रकावरून नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.एकीकडे कर्नाटकात हिजाब वाद तापत असताना मुंबईतील या महाविद्यालयाने घेतलेला निर्णय वादात सापडण्याची शक्यता आहे.
या महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थीनींच्या पालकांनी याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींकडे तक्रार दाखल केली असून लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष घालावं, अशी मागणी केली आहे.