महाराष्ट्रमुंबई

कुर्ला पश्चिम हलावपूलवर मेट्रो 2बीचे काम अग्निशमन दलाच्या एनओसीशिवाय सुरू

मुंबई : कुर्ला पश्चिम हलावपूल परिसरातून मेट्रो 2बी मार्ग जात आहे. मात्र, अद्यापही अग्निशमन दलाची ना हरकत प्रमाणपत्र (NOC) न घेताच काम सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यासंदर्भात एमएमआरडीए, मुंबई महानगरपालिका आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांसोबत जागेची पाहणी केली.

या पाहणीत एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता श्रीकांत जाधव, पालिकेचे कार्यकारी अभियंता नितीन देशमुख, उप प्रमुख अग्निशमन अधिकारी संदेश राणे, विभागीय अधिकारी प्रीतम सावंत तसेच आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, उमेश गायकवाड, अनिल मांडवकर, प्रकाश चौधरी आणि अनेक स्थानिक नागरिक उपस्थित होते.

स्थानीय नागरिकांची प्रमुख मागणी अशी आहे की मेट्रो मार्गाची उंची 5 मीटरने वाढवावी, जेणेकरून भविष्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही. बाजूचा रस्ता विकसित करावा, गणेशोत्सव व नवरात्रीसारख्या सार्वजनिक सणांसाठी सोयीस्कर व्यवस्था निर्माण करावी. पालिकेने सर्व्हे करून प्रस्तावित विकास कामे एमएमआरडीएला सुचवावीत, जेणेकरून वरिष्ठ पातळीवर निर्णय होऊन त्वरित अंमलबजावणी करता येईल. नागरिकांचा आग्रह आहे की एमएमआरडीए आणि मेट्रो प्रशासनाने या प्रकरणी तत्काळ निर्णय घेऊन आवश्यक सुधारणा कराव्यात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!