ब्रेकिंग
रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून दिवसाढवळ्या मुंबईच्या मुलुंड परिसरात कोट्यावधीचा दरोडा,सीसीटिव्ही फुटेज आले समोर

मुंबई :- रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून दिवसाढवळ्या मुंबईच्या मुलुंड परिसरात लाखोंचा दरोडा घातला गेल्याची घटना समोर आली आहे. मुलुंडच्या पाच रस्ता परिसरात असलेल्या एडनवाला इमारतीमधील तळमजल्यावर वी पटेल या व्यावसायिक गाळ्यांमध्ये ही घटना घडली आहे.या घटनेने परिसरात खळबळ माजली असून पोलीस सध्या दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.
काल दुपारी साडेतीनच्या सुमारास एका कारमधून पाच अज्ञात व्यक्ती या परिसरात आले आणि त्यांनी थेट या गाळ्यामध्ये प्रवेश करून बंदुकीचा धाक दाखवून या ऑफिसमधून कोट्यावधीची रोख रक्कम घेऊन ते फरार झाले.
सध्या घटनास्थळावर पोलीस आणि क्राइम ब्रांच पथक तपास करत असून या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करत आहेत.दरम्यान पोलीसांच्या हाती या घटनेचे सीसीटिव्ही फुटेज लागले असून याच आधारे ते पुढील तपास करणार आहेत.