उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी घेतली मंगेशकर कुटुंबियांची सांत्वनपर भेट

मुंबई- आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत ह्यांनी मंगेशकर कुटुंबियांची काल सांत्वनपर भेट घेतली. यावेळी उदय सामंत यांनी मास्टर दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे भूमिपूजन लता दिदींच्या हस्ते होणार होते. मात्र, दुर्दैवाने ते होऊ शकले नाही. परंतु, लता दिदींचे स्वप्न पूर्ण करणार आहे, असे जाहीर आश्वासन मंगेशकर कुटुंबियांना दिले.
त्यावेळी, उषाताई मंगेशकर, पं.हृदयनाथ मंगेशकर, आदिनाथजी मंगेशकर,अल्का याज्ञिक, उदय सामंत ह्यांचे परममित्र मयूरेश पै उपस्थित होते.दरम्यान कलाविश्वासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जाण्यानं कला विश्वात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
सत्तरहून अधिक वर्ष कलाविश्वासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या लता मंगेशकर या एकमेव कलाकार होत्या.त्यांनी ९०० हून हिंदी गाणी आणि २६ हून अधिक प्रादेशिक भाषांमध्ये गायन केले आहे.त्यांनी केलेल्या याच महत्त्वपूर्ण कामगिरीबाबत भारतरत्न हा सर्वाेच्च नागरिक पुरस्काराने त्यांना देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता.