मंत्रालयमहाराष्ट्र

राज्य सरकार दाद देत नसल्याने पत्रकार संघटनांच्या शिष्टमंडळाकडून शरद पवारांना साकडे..

मुंबई :पत्रकारांना फ्रन्टलाईन वर्कर म्हणून मान्यता मिळावी या मागणीसाठी मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए आणि बीयुजे या संघटनांच्या एका शिष्टमंडळाने एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी गुरुवारी भेट घेतली..

राज्यात १४२ पत्रकार कोरोनाचे शिकार ठरले असताना देखिल सरकार पत्रकारांच्या विषयाकडे पूर्णता दुर्लक्ष करीत असल्याची बाब ही शिष्टमंडळाने शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिली.. पत्रकार पेन्शन, पत्रकारांवरील हल्ले, पत्रकार आरोग्य योजना, अधिस्वीकृती समितीचे पुनर्गठण, मुंबईतील पत्रकारांना लोकलमधून प्रवास करण्याची सुविधा आदि विषय देखिल शिष्टमंडळाने पवार यांच्या कानावर घातले आणि पत्रकारांच्या विविध प्रश्नांबाबत आपण लक्ष घालावे अशी विनंती त्यांना केली.. . “पत्रकारांच्या प्रश्नांबाबत आपण लक्ष घालू” असे आश्वासन शरद पवार यांनी शिष्टमंडळाला दिले..
शिष्टमंडळात एस.एम.देशमुख, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर, टीव्हीजेएचे अध्यक्ष विनोद जगदाळे, बीयुजेचे जॉइन्ट सेक्रेटरी सुरतचंद ठाकूर, आदि सहभागी झाले होते.. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे व दीपक कैतके उपस्थित होते..
पत्रकारांच्या वरील संघटनांनी यापुर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्याकडेही पत्रकारांना फ्रन्टलाईन वर्कर म्हणून जाहीर करण्याची विनंती केली आहे..
यावेळी एस एम देशमूख यांनी संघर्षाची पंच्याहत्तरी हे मराठी पत्रकार परिषदेचा इतिहास सांगणारे तसेच कथा एका संघर्षाची ही दोन पुस्तके शरद पवार यांना भेट दिली..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!