मंत्री उदय सामंत यांनी केला डोंबिवली मधील टँकरमाफियांचा पर्दाफाश
रात्री अचानक धाड टाकून केली कारवाई

मुंबई,दि.14(महेश पावसकर)
संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाने अंगाची काहिली होत असतानाच अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. डोंबिवली शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या संपूर्ण भाग टँकरवर अवलंबून आहे. पण, या टँकरमाफियांचा पर्दाफाश शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. सोमवारी मध्यरात्री डोंबिवलीमध्ये धाड टाकून बेकायदेशीर टँकर कंपनीला सील ठोकले.
डोंबिवलीमध्ये टॅंकर माफियांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची खुद्द मंत्री उदय सामंत यांनी दखल घेतली. सोमवारी रात्री उशिरा स्वतः अधिकारी आणि पोलिसांसह एका कंपनीवर धाड टाकली.कल्याण डोंबिवली पालिकेचे पाणी चोरी करुन विकले जात होते. एकूण 4 ठिकाणी धाडी टाकल्या. पालिकेचे पाणी चोरून अवैध मिनरल वॉटरचा चक्क कारखानाच उभारला होता.
सोबत हजारो लिटरच्या अवैध टाक्या बांधल्या होत्या. कारखाना सिल करुन टॅंकर पोलिसांनी ताब्यात घेतला. या माफियां कडून कल्याण डोंबिवली पालिकेचे पाणी चोरी करुन विकले जात होते. हजारो लिटरच्या अवैध टाक्या बांधल्या होत्या. कारखाना सिल करुन टॅंकर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. टॅंकर चालकांचे परवाने जागच्या जागी रद्द केले आहे.
टॅंकर माफियांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी उदय सामंत यांनी टॅंकर लॉबीचे ऑडिट करण्याचे निर्देश दिले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून डोंबिवलीमधील 27 गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. टॅंकर चालकांचे परवाने जागच्या जागी रद्द केले आहे.