कोंकण

चाहत्याने लावलेली पैज जिंकून देण्याकरिता मंत्री उदय सामंत राहिले विवाह सोहळ्याला उपस्थित!

सामान्य कार्यकर्त्यांसाठी धावणारा मंत्री

रत्नागिरी: राज्य मंत्री मंडळात कॅबिनेट मंत्री असलेल्या आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी काल मेमन समाजातील एका युवा कार्यकर्ता सफवान लंघा याच्या लग्न सोहळ्याला उपस्थित राहून त्याच्या मनतील इच्छा पूर्ण केली ह्या छोट्याश्या प्रसंगातून मंत्री  उदय सामंत यांची तळागळातील कार्यकर्त्यांशी किती आपुलकीची भावना आहे ही पुन्हा एकदा दिसून आले.

*मेमन समाजातील एक धनजी नाका परिसरात कपडे विकणारे रफिक लंघा यांचा मुलगा सफवान हा ना.उदय सामंत यांचा खूप मोठा फॅन आहे. त्याची इच्छा होती की माझ्या लग्न सोहळ्याला ना.उदय सामंत यांनी यावे आणि मला आशिर्वाद द्यावे. आणि ही भावना त्याने आपल्या समाजातील मित्र परिवारा मध्ये बोलून दाखवली. काहींनी त्याची टिंगल केली त्यामधून सफवानने सुद्धा जिद्द केली आणि विषय अखेर पैजेवर गेला.
त्यांनतर सफवानने त्याचे मित्र प्रथमेश मोरे आणि युवराज शेट्ये यांच्या कडे आपली इच्छा बोलून दाखवली. मित्रांनी सुद्धा त्याला समजवण्याचा प्रयत्न केला पण त्याने जणू बाल हट्टच धरला की माझ्या लग्न सोहळ्याला सामंत साहेब आलेच पाहीजेत अस आग्रह ह्या दोघांकडे धरला. सफवानचा हट्ट आणि त्याचे सामंत साहेबांवर असलेले प्रेम आणि त्या प्रेमापोटी त्याने लावलेली पैज हे पाहून त्याचे मित्र प्रथमेश मोरे आणि युवराज शेट्ये यांनी त्याची भेट रेस्टहाऊसवर ना.सामंतांशी घडवून आणली.त्यावेळी लग्नाची निमंत्रण पत्रिका देताना त्याच्या मित्रानी त्याचे सामंत साहेबांवरील प्रेम आणि त्याने लावलेली पैज हा सारा विषय ना.समांत यांच्या कानावर घातला.हे सारं ऐकताच ह्या छोट्याश्या कार्यकर्त्यांचे प्रेम आणि त्याची इच्छा लक्षात घेता ना.सामंत यांनी तात्काळ तुझ्या लग्न सोहळ्याला मी येणारच असा शब्द दिला आणि त्याच बरोबर तू पैज जिंकलास असे आश्वासन ही दिले.

त्याप्रमाणे काल दि.४/१२/२०२१ रोजी आपल्याधावपळीच्या दौऱ्यात ना.सामंत यांनी वेळात वेळ काढुन आपल्या वाहनांचा ताफा मेमन हॉल कडे वळवला आणि सफवान च्या लग्न सोहळ्याला त्यांनी उपस्थित राहून त्याची ईच्छा पूर्ण केलीच आणि त्याची पैज ही त्याला जिकुंन दिली. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या मेमन समाजातील सर्व पदाधिकारी आणि मित्र मंडळींनी मंत्री सामंत यांचे स्वागत केले आणि ह्या लग्न सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल समाधान ही व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!