दिंडोशीतील कचऱ्याच्या समस्ये बाबत उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन यांचेकडे बैठक

मुंबई : दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील कचऱ्याची समस्या, बंद असलेले हायवा, घरोघरी जाऊन कचरा संकलना मध्ये येणाऱ्या अडचणी, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणा मार्फत बांधण्यात आलेल्या इमारतींमधून महापालिकेमार्फत कचरा संकलन करणे तसेच या परिसरात देखील मॅनिंग मॉपिंग योजना आणि वस्ती स्वच्छता योजना लागू कराव्या. या सोबतच दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील लॉट १२ ची कामे मागील दोन वर्षात धिम्या गतीने सुरू असून नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते यावर तात्काळ उपाययोजना करावी, तसेच म्हाडा मार्फत बांधण्यात आलेल्या ज्या शौचालयांचे दरवाजे सडून खराब झाले आहेत, शौच कूप तुटले आहेत याबाबत दिलेले प्रस्ताव मंजूर असून, सदर कामे तातडीने सुरू करावीत या विषयावर पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त किरण दिघावकर यांच्यासोबत आमदार सुनील प्रभू यांनी बैठक आयोजित केली. यावर तात्काळ उपाय योजना करण्याची मागणी मुंबई महापालिका प्रशासनाकडे केली असता, उपायुक्त किरण दिघावकर यांनी सर्व समस्यां सोडविण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला.

यावेळी दिंडोशी विधानसभा संघटक प्रशांत कदम, माजी महापौर सुहास वाडकर, माजी नगरसेवक तुळशीराम शिंदे, उपविभाग प्रमुख भाई परब, सुनील गुजर, प्रदीप निकम, शाखाप्रमुख संपत मोरे, विजय गावडे, संदीप जाधव, रमेश कळंबे, अशोक राणे तसेच महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता अजय पाटणे, पी उत्तरे विभागाचे कार्यकारी अभियंता हरिश्चंद्र जाधव आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.





