देशविदेश

पावसाळ्यात मोबाईल भिजण्याची चिंता सोडा; हे करून पाहा

नवी दिल्ली : पावसात बाहेर असताना स्वत:पेक्षा फोनची काळजी जास्त वाटते. बर्‍याच वेळा असं होतं की, अचानक पाऊस पडतो आणि आपल्याकडे छत्री किंवा रेनकोट नसतो. त्यावेळी सगळ्यात जास्त दु:ख फोनबद्दल वाटतं असत की, आता आपल्या फोनचं कसं होणार? पाऊस वेळीअवेळी कधीही येतो. कधीकधी फोनवर बोल असताना त्यावर पाणी पडण्याचीही भीती असतेच. त्यामुळे पावसाळ्यात फोन सुरक्षित ठेवायचा असेल तर, या टिप्स फॉलो करा.

वॉटर प्रूफ ब्लूटूथ इयरबड्स

आपला स्मार्ट फोन पावसापासून वाचवण्यासाठी आपण वॉटर प्रूफ ब्लूटूथ इयरबड्स (Water Proof Bluetooth Ear buds) वापरू शकता. फोन ब्ल्यूटूथशी कनेक्ट (Blue Tooth Conation)केल्यानंतर,आपला स्मार्ट फोन बॅगत ठेवून सहज वापरू शकता. फोनवर बोलण्यासाठी आपल्याला आपला फोन पर्स किंवा बॅगमधून काढण्याची आवश्यकता नसते. ब्ल्यूटूथच्या वापरामुळे फोन पावसात भिजण्याची भीती तर, नसतेच शिवाय हरवण्याची,पडण्याचीही धास्ती राहत नाही.

प्लास्टिक झिप पाऊच

स्मार्ट फोनच्या आकाराचे झिप पाऊच (Plastic Zip Pouch) बाजारात मिळतात. यात पोन ठेवला तर, ओला होण्याची भीती राहत नाही. पावसाळ्याच्या दिवसात दररोज याचा वापर करा. प्लॅस्टिकच्या झिप पाउचमध्ये फोन ठेवल्यानंतर, हातात,खिशात, पिशवी आणि पर्समध्येही ठेवता येतो.

वॉटर प्रूफ मोबाइल बॅग

स्मार्ट फोन ओला होण्यापासून वाचवण्यासाठी वॉटर प्रूफ मोबाईल बॅगचीही (Water Proof Mobile Bag) मदत घेऊ शकता. या पिशव्यांचं वैशिष्ट्य म्हणजे सहज हातात घेता येतात किंवा स्लिंग बॅगप्रमाणे बाजूला लटकवता येतात. म्हणजे फोन त्यात ठेवला की पाण्यात भिजण्याची चिंता राहत नाही.

वॉटर प्रूफ फ्लिप मोबाईल कव्हर

महागडा फोन पावसात ओलो होऊ नये यासाठी वॉटर प्रूफ फ्लिप मोबाईल कव्हर (Water Proof Flip Mobile Cover) वापरा. त्यामुळे फोन पावसात ओला होण्यापासून तर,वाचेलच शिवाय पडून फुटणारही नाही. बरेच लोक मोबाईसाठी कव्हर वापरतात. पण साध्या मोबाईल कव्हर पेक्षा वॉटर प्रूफ फ्लिप मोबाईल कव्हर वापरलं तर,फोन पावसात ओला होण्यापासून आणि खाली पडून तुटण्यापासूनही वाचवता येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!