मुंबई

पश्चिम द्रुतगती महामार्गावर दिंडोशी मालाड पूर्वेला उभारले वातानुकूलित आधुनिक व सुसज्ज शौचालय

मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावरून रोज सुमारे 5 लाख वाहने मुंबईकडे आणि मालाड -दहिसरकडे जातात. कांदिवली येथून वांद्रे कडे जाताना कांदिवली पूर्व नंतर थेट अंधेरी पूर्व येथे शौचालय आहे  या दरम्यान या महामार्गावर महिला व पुरुषांसाठी सुसज्ज शौचालयच नव्हते यामुळे प्रवाशांची कुचंबणा होत असे. त्यातच सध्या अंधेरी ते दहिसर मेट्रोचे काम येथे सुरू असल्यामुळे येथे मोठी वाहतूक कोंडी होये त्यामुळे प्रवाशांना तासंतास गाडीत बसून राहत लागत असल्याने शौचालया अभावी नागरिकांचे आणि विशेषकरून मधुमेह आणि रक्तदाबग्रस्त नागरिकांचे आणि माहिलांचे खूप हाल होत होते.

शिवसेनेच्या प्रयत्नामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर अदानी इलेक्ट्रिसिटी ऑफिस जवळ वातानुकूलित आधुनिक व सुसज्ज निर्मल शौचालय उभारून शिवसेनेने मधुमेह आणि रक्तदाब रुग्णाना व प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. कांदिवली पासून वांद्रेच्या दिशेने जाताना साऊथ बॉण्ड दिशेला मालाड पूर्वेला शौचालय असावे म्हणून शिवसेना नेते खासदार गजानन किर्तीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे मुख्य प्रतोद दिंडोशी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार आणि विभागप्रमुख सुनील प्रभू प्रयत्नशील होते.

पश्चिम दुर्तगती महामार्गावर मालाड अदानी इलेक्ट्रिसिटी ऑफिस जवळील पंचरत्न सोसायटी जवळील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेवर जुने शौचालय पंचरत्न सोसायटीचे रहिवासी वापरत होते. ते ना दुरुस्त झाल्याने त्या जागेवर म्हाडा प्राधिकरणाने पुरुष आणि महिलांसाठी वातानुकूलित निर्मल शौचालय उभारले आहे. आमदार प्रभू यांच्या हस्ते या शौचालयाचा लोकार्पण सोहळा पार पडला.

या पैसे द्या व वापरा वातानुकूलित शौचालयाचे परिरक्षण कुटीर मंडल संस्थे द्वारे केले जाणार असून परिसरात राहणाऱ्या लोकांना मात्र पूर्वी प्रमाणे सुविधा मोफत असल्याची माहिती यावेळी बोलतांना आमदार सुनिल प्रभु यांनी दिली. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व एमएमआरडीए प्राधिकरणतर्फे दिल्या जाणाऱ्या परवानग्या घेण्यासाठी टाळेबंदीमूळे विलंब झाला तसेच टाळेबंदी कालावधीत कामगार उपलब्ध नव्हते यामुळे शौचालय उभारणीस उशीर झाला व त्यामुळे गैरसोय झाली त्याबद्दल आमदार सुनिल प्रभु यांनी माता भगिनींना दिलगिरी व्यक्त केली.

 यावेळी उपमहपौर सुहास वाडकर, विधानसभा संघटक प्रशांत कदम, विष्णू सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कूरार पोलीस ठाणे बेले, शाखा प्रमुख सुभाष धानुका आणि शिवसैनिक आणि येथील नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!