पावसाळ्यात कपड्यांची वाढते दुर्गंधी; करा हे सोपे उपाय
पावसाळ्यात न वाळणारे कपडे यामुळे वैताग येतो. पावासाळ्यात सगळ्यांनाच होणारी मोठी समस्या म्हणजे कपड्यांना येणारी दुर्गंधी, कितीही प्रयत्न केला करी पावसाळ्यात कपड्यांना येणारा वास जात नाही. त्यामुळे असे कपडे बाहेर घालून जाणंही अशक्य असतं. दमट वातावरणात कपड्यांना लवकर वास येऊ लागतो. अशा कपड्यांमध्ये बॅक्टेरियाही वाढतो. त्यामुळे स्किन इनफेक्शनचा धोकाही वाढतो. कपड्यांना येणाऱ्या दमट वासाला त्रासले असाल तर, या टिप्स जाणून घेवूयात…
कपडे हवेवर वाळवा
पावसाळ्यात कपडे लवकर वाळत नाहीत. अशावेळी कपडे धुतल्यानंतर मोकळ्या जागेत वाळत घाला. पंख्याच्या हवेवरही कपडे सुकवू शकता. यामुळे कपड्यांचा दुर्गंध येणार नाही.
लिंबाच्या रसाचा वापर
दमट हवेने ओल्या कपड्यांचा दुर्गंध येऊ लागतो. अशा परिस्थितीत कपडे धुवताना लिंबाचा रस वापरल्यास कपड्यांना घाण वास येणार नाही.
भिजलेले कपडे लगेच धुवून टाका
पावसात भिजलेले किंवा वापरलेले कपडे घातल्यास त्यांना जास्त वास येतो. त्यामुळे असे कपडे साठवून ठेवू नका. भिजलेले कपडे लगेच धुवून टाका. त्यामुळे त्यात बॅक्टेरिया वाढणार नाही. असे कपडे चुकूनही कपाटात किंवा गोळा करून ठेवू नका. यामुळे इतर कपड्यांनाही वास येतो.






