कुडाळ मध्ये शिवकालीन शस्त्र प्रदर्शना उत्तम प्रतिसाद

शस्त्र, नाणी, मोडी लिपी पत्र, खेळ यांची मांडणी रणजित देसाई यांच्या हस्ते शुभारंभ

सिंधुदुर्ग – शिवशंभू विचार मंचाच्या वतीने शिव विचार दर्शन अंतर्गत कुडाळ हायस्कूलच्या आरती प्रभू कलादालनामध्ये शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल आहे. या शस्त्र प्रदर्शनातून शिवकालीन गडकिल्ले छायाचित्रे, नाणी, विविध प्रकारची शस्त्रे, मोडी लिपीतील पत्र यांच्या मांडणीतून शिवकालीन वातावरण उभे करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. स्वामी समर्थ प्रतिष्ठान आणि शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघ आयोजित या प्रदर्शनाचे उदघाटन स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष रणजित देसाई यांच्या हस्ते शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाले. यावेळी शिवछत्रपतींचा जयजयकार करण्यात आला.

शिव शंभो विचारमंचाचे अजयराज जगताप, रुपेश मोरे, पंकज भोसले, प्रमोद काटे, रामा नाईक, दत्ताराम साळुंके, घनःश्याम परब, साईप्रसाद मसगे यावेळी उपस्थित होते.या प्रदर्शनात शिवकालीन शस्त्रे, शिवकालीन नाणी, मोडिलिपीतील पत्र, दस्तऐवज, शिवरायांच्या आरमाराची माहिती, छत्रपती शिवाजी महाराजांची अनेक चित्रकारांनी काढलेली चित्रे, शिवकालीन बैठे खेळ यांची मांडणी करण्यात आली आहे. आताच्या पिढीला शिवरायांचा इतिहास समजावा, त्यांना दिवाळीच्या सुट्टीत काहीतरी चांगले पाहायला मिळावे यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याचे शिव शंभो विचारमंचाचे अजयराज जगताप यांनी सांगितले.

कुडाळ प्रमाणेच उद्या मालवण आणि नंतर दोडामार्ग येथे हे प्रदर्शन पहायला मिळणार असल्याचे श्री. जगताप म्हणाले. प्रदर्शनाला कुडाळ हायस्कुल आणि आरती प्रभू कलादालनाचे सहकार्य लाभल आहे. या प्रदर्शनाला खूप चांगला प्रतिसाद लाभला. विद्यार्थी, पालक, शिक्षक, नागरिक यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. या सर्वांना आयोजकांनी माहिती देत शिवकाळाची सफर घडवून आणली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!