महाराष्ट्रमुंबईराजकीय

आ.अतुल भातखळकर यांच्या हस्ते कांदिवली पूर्व विधानसभेतील ‘ब्लिस कंपाउंड’ मालाड पूर्व येथील डीपी रोडचे उदघाटन संपन्न

मुंबई : कांदिवली पूर्व विधानसभेतील ‘ब्लिस कंपाउंड’ मालाड पूर्व येथील डीपी रोडचे उदघाटन आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या १०-१२ वर्षात मालाड पूर्व येथे विविध विकास कामं हाती घेण्यात आली. त्याच प्रमाणे अशा अनेक डीपी रोड वर अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामं होती, अशा अनेक समस्या दूर करून लोकांच्या यातायातीसाठी आपण डीपी रोड साकारले आहेत, असे भातखळकर यांनी सांगितले.

मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वात २०१४ पासून देशभरात अनेक विकास प्रकल्प आणि जनहिताच्या योजना राबवण्यात आल्या. प्रत्येक योजना आज थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या आहेत. तसेच महाराष्ट्रात मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वात मेट्रोचं जाळं विण्यात आले. आज आपण बघू शकता नागरिकांना ह्या सुविधेचा लाभ मिळाला आहे असे उद्गार भातखळकर यांनी काढले.

नागरिकांच्या मागणी दाखल घेऊन डीपी रोडच्या समस्येचे निरसन करून आज उदघाटन करण्यात आले. नवरात्री आणि दसऱ्याच्या निमित्ताने नागरिकांच्या सोयीसाठी डीपी रोडची भेट देण्यात आली आहे असे आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!