ब्रेकिंग
गोव्यात काँग्रेसलाही घ्यावा लागला धर्माचा आधार, निवडून आल्यावर पक्ष बदलू नये यासाठी उमेदवारांना दिली मंदिर, चर्च आणि दर्ग्यात नेऊन शपथ

गोवा:- गोवा विधानसभेची निवडणूक पुढील महिन्यात होणार असल्याने भाजपशासित राज्यात गेल्या पाच वर्षात पक्षांतरामुळे हैराण झालेल्या काँग्रेसने पक्षाच्या उमेदवारांना एकदा निवडून आल्यावर पक्ष बदलणार नाही, अशी ईश्वरसाक्षीने शपथ दिली आहे.
काँग्रेसने शनिवारी आपल्या सर्व ३४ उमेदवारांना बसने मंदिर, चर्च आणि दर्ग्यात नेले आणि त्यांना ‘पक्षांतरविरोधी’ शपथ दिली.गेल्या विधानसभा निवडणुकीपासून पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या बहुतांश आमदारांनी पक्ष सोडला आहे.
४० सदस्य असलेल्या राज्य विधानसभेच्या २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसने १७ जागा जिंकल्या होत्या आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता, परंतु आता त्यांच्याकडे फक्त दोन आमदार शिल्लक आहेत.