ब्रेकिंगमहाराष्ट्र
मुंबईत पुन्हा धो धो पाऊस:आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा!

मुंबई: रविवार सोमवार या दोन दिवसांत मुसळधार बरसून मंगळवारी उसंत घेतल्यानंतर आज सकाळपासून मुंबईत पावसाने पुन्हा धुवांधार बरसायला सुरुवात केली आहे. सततच्या पावसामुळे मिठी नदी सध्या तुडुंब भरून वाहत आहे. अशातच आज सकाळी 9 वाजून 56 मिनिटांनी समुद्राला मोठी भरती येणार आहे. या काळात पाऊस सुरुच राहिल्यास मुंबई पुन्हा एकदा जलमय होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या 24 वॉर्डांमध्ये यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पुढील दोन दिवस मुंबई सह रायगड, रत्नागिरी येथे अतितीव्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.