मुंबई:मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आली असताना मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्याविरोधात काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी थेट सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे तक्रार केली आहे. भाई जगतापांची कार्यपद्धतीवर बोट ठेवत, आपल्याला डावललं जात असल्याचा आरोप झिशान सिद्दीकींनी केला.
याबाबत भाई जगताप यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे की त्याचं जेवढं वय आहे, त्यापेक्षा जास्त कालावधीत मी राजकारणात आहेत आणि फक्त आणि फक्त काँग्रेसमध्ये. त्यामुळे माझी कारकीर्द, कामकाजाची पद्धत नेत्यांना माहिती आहे. जाणीवपूर्वक मी अध्यक्ष म्हणून वेगळी वागणूक कोणाला देत नाही. ज्यावेळी अपेक्षा व्यक्त केल्या जातात, प्रोटोकॉल असेल तर तो झिशान सिद्दीकीलाही लागतो आणि भाई जगतापलाही लागतो. मी झिशान सिद्दीकीशी चर्चा करुन, नाराजीबद्दल मार्ग काढेन, असं भाई जगताप म्हणाले.