ब्रेकिंग
मुंबई-गोवा महामार्ग गेल्या दिड तासांपासून ठप्प, चौपदरीकरणाचे काम सुरू असलेल्या परशुराम घाटात डोंगर खचला, ढिगाऱ्याखाली अडकून एका कामगाराचा मृत्यू

चिपळूण:– मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणजवळ गेल्या अडीच तासांपासून वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. परशुराम घाटामध्ये महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. दरम्यान आज सकाळी हे काम सुरू असताना येथील डोंगर खचला आणि रस्त्यावर दरड कोसळली.
या दरडीखाली येवून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे.दरम्यान वाहतूक सेवा पुन्हा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने हालचाल सूरू केली आहे. दीड वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून आता अडीच तास होत आले ही वाहतूक अजूनही पूर्वरत झालेली आहे.
पर्यायी मार्गाचा वापर करण्याचेही आवाहन वाहन चालकांना वाहतूक शाखेकडून करण्यात येत आहे.दरम्यान काहीच वेळात वाहतूक पूर्वपदावर येईल अशी माहिती स्थानिक प्रशासनाने दिलेली आहे.