ब्रेकिंग
हिंदुस्तानी भाऊची ३० हजारांच्या जामीनावर सुटका

मुंबई:-दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षेवरून आंदोलनासाठी भडकवल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या युट्यूबर – व्लॉगर हिंदुस्तानी भाऊ उर्फ विकास पाठकची आज अखेर जेलमधून सुटका झाली आहे.मुंबई सत्र न्यायालयानं विकास पाठक उर्फ हिंदुस्तानी भाऊचा जामीन अर्ज स्वीकारला आहे.
हिंदुस्तानी भाऊची ३० हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देश आज उच्च न्यायालयाने दिले आहेत. ऑनलाईन परीक्षेसाठी शालेय शिक्षणमंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन केल्याप्रकरणी हिंदुस्थानी भाऊला अटक झाली होती.यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली होती.
दरम्यान आज त्याचा जामीन अर्ज कोर्टाने स्वीकारल्याने हिंदुस्थानी भाऊला मोठा दिलासा मिळाला आहे.