कोंकण
मंत्री उदय सामंत यांनी शासकीय प्रोटोकॉल बाजूला सारत जुन्या मित्राच्या हॉटेल मध्ये घेतला पाहुणचार!

पाली: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत राज्याचे कॅबिनेट मंत्री असले तरीही त्यांचे पाय नेहमी जमिनीवरच असतात. ह्याचा प्रत्यय आज पुन्हा त्यांच्या पाली ह्या गावी दिसून आला.
राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून आपल्या दिनक्रमाला आज सुरुवात करताना उदय सामंत ह्यांनी आपले शासकीय प्रोटोकॉल बाजूला ठेवत पाली येथील आपला जुना मित्र अमोल गुरव ह्यांच्या हॉटेल मध्ये आवर्जून थांबत तेथील पूर्वीपासून प्रसिध्द असलेल्या कट-वडा आणि कोकम सरबताचा आस्वाद घेतला. त्यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देत दोन जुन्या मित्रांमध्ये गप्पा देखील रंगल्या. राज्याचे कॅबिनेट मंत्री असून देखील उदय सामंत ह्यांचे पाय जमिनीवरच आहेत हे पालीवासियांनी आज पुन्हा एकदा अनुभवले.