नवाब मलिकांचे भाजपावर गंभीर आरोप,म्हणाले राज्यभरात देवस्थानांच्या जमिनीचा घोटाळा..

मुंबई- राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक हे नेहमीच काहीना काही गौप्यस्फोट करत असतात. त्यामुळे ते नेहमीच कोणत्या न कोणत्या अडचणींमध्ये पहायला मिळतात. अशातच आता त्यांनी भारतीय जनता पार्टीत निशाणा साधला आहे. यापूर्वी सुद्धा एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर त्यांनी अनके गंभीर आरोप केले होते.
राज्यभरात देवस्थानांच्या जमिनीचा घोटाळा सुरु आहे आणि या घोटाळ्याला भाजप नेते जबाबदार आहे, असा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे. यावेळी बीडमध्ये एकूण ५१३ एकर जमिनींचा घोटाळा झाल्याचा आरोप नवाबांनी केला आहे. यावरुन त्यांनी भाजप पक्षावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत.
भाजप आमदार रामाची जागा, विठोबाची जागा लाटत आहेत. यामध्ये हजारो कोटींचा घोटाळा झाला असल्याचंही नवाब मलिकांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं. आम्ही देवस्थाची जागा हडपणाऱ्यांविरोधात कारवाई करायला सुरुवात केली आहे. ज्या तक्रारी दाखल आहेत त्यांची चौकशी करुन गुन्हा दाखल करणार आहे, असा इशाराही मलिकांनी यावेळी दिला आहे.