पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत देशभर दिलासादायक चित्र,महाराष्ट्रात मात्र इंधनाचा चटका कायम !

मुंबई:- सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमतींचे दिलासादायक चित्र आहे. अनेक राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमती या शंभरी आत आल्या आहेत. मात्र,महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचे विदारक चित्र पाहायला आहे. महाराष्ट्रात रोजचे वाढत जाणारे दर हे सर्वसामान्यांसाठी डोके दुःखी ठरत आहेत. वाढत असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. याचधर्तीवर आज आपण देशभरातील विविध शहरातील आणि महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलचे दर पाहुयात.
- पेट्रोलचे दर प्रति/लिटर पुढीलप्रमाणे:-
१.अहमदाबाद :- ९५.१३
२.आग्रा :- ९५.०५
३.प्रयागराज :- ९५.३५
४.दिल्ली :- ९५.४१
५.मुंबई :- १०९.९८
६.नागपूर :- १०९.७१
७.पुणे :- १०९.५२
८.ठाणे :- ११०.१२
९. कोल्हापूर :- ११०.०९
१०. नाशिक :- ११०.४०
याचसोबत आपण देशभरातील आणि महाराष्ट्रातील डिझेलच्या किंमतींवरही एक नजर टाकूयात.
- डिझेलचे दर प्रति/लिटर पुढीलप्रमाणे:-
१.अहमदाबाद :- ८९.१२
२.आग्रा :- ८६.५६
३.प्रयागराज :- ८६.६७
४.दिल्ली :- ८६.६७
५.मुंबई :- ९४.१४
६.नागपूर :- ९२.५३
७.पुणे :- ९२.३१
८.ठाणे :- ९४.२८
९. कोल्हापूर :- ९२.८९
१०. नाशिक :- ९३.१६
डिझेलच्या वरील तक्त्याचा जर आपण विचार केला तर डिझेलच्या देशभरातील बहुतांश राज्यातील किंमती या नवदी आत आहेत.तर महाराष्ट्रातील डिझेलच्या किंमती या नव्वदी पार गेल्या आहेत.
हे सर्व पाहता राज्यातील सर्व सामान्य जनतेला दररोज खिशाला नाहक फटका बसत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.