मुंबई,दि.२४:’ब्रेक द चेन’ अंतर्गत लावण्यात आलेल्या निर्बंधांमधून अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्या वर्गाला प्रवास करण्यासाठी त्यांच्या खासगी वाहनावर लाल, पिवळा, व हिरव्या रंगाचे स्टिकर्स लावण्याचे स्वतः चेच आदेश आज मुंबई पोलिसांनी रद्द केले आहेत.
हे आदेश रद्द करण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी ट्विटर द्वारे जाहीर केले आहे, व तसे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
प्रिय मुंबईकरांनो, लाल, पिवळा, हिरवा रंग #EmergencyStickers वर्गीकरण बंद केले जात आहे. तथापि, संपूर्ण तपासणी चालू ठेवली जाईल आणि आम्ही आशा करतो की, आपण #TakingOnCorona मध्ये आमच्या पाठीशी उभे राहाल आणि घराबाहेरची सर्व अनावश्यक / विना-आपत्कालीन हालचाल टाळाल.#StayHomeStaySafe असे मुंबई पोलिसांनी आवाहन केले आहे.
आदेश वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा-: