गोरेगाव मिरर करीत असलेले काम कौतुकास्पद-मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे

मुंबई: गोरेगावातल्या समस्या, औद्योगिक, सामाजिक प्रश्न, येथल्या उद्योजकांचे,कलाकारांचे व साहित्यिकांचे कार्य जनतेपुढे आणणे तसेच समाजप्रबोधनाचे काम आपल्या अग्रलेखांद्वारे मांडणे या सारखी विधायक कामे गोरेगाव मिरर करत आहे, हे कौतुकास्पद आहे.
वृत्तपत्र वाचण्याची सवय दिवसेंदिवस कमी होत असताना तसेच छापील वृत्तपत्र चालवणे जिकिरीचे होत असताना देखील गेली ३ वर्षे विनाखंड वृत्तपत्र चालविणे तसेच प्रतिवर्षी उत्कृष्ट असा दिवाळी अंक काढणे या करीता संपादक महेश पावसकर निश्चितच कौतुकास पात्र आहेत.मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे उपाध्यक्ष, मुंबई मराठी पत्रकार संघाचे आजीव सदस्य तसेच मुंबई प्रेस क्लब सारख्या प्रतिष्ठित पत्रकार संघात पत्रकारांच्या विविध प्रश्नांबाबत आग्रही असणारे व पत्रकारांच्या कल्याणकारी योजनांबाबत पाठपुरावा करत राहणाऱ्या पावसकर यांचे कार्य उल्लेखनीय आहे.
मी महेश पावसकर तसेच ते चालवीत असलेले गोरेगाव मिरर हे वृत्तपत्र व मिरर महाराष्ट्र हे वेब न्यूज पोर्टल यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो अशा शब्दात मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी कौतुक केले.
गोरेगाव न्यू म्हाडा कॉलनी जवळील गेली कित्येक वर्षांपासून सुरु न होऊ शकलेली पोलीस चौकी सुरु करण्याबाबत व येथील गुन्हेगारीस आळा बसवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आपण मुंबईचे पोलीस आयुक्त श्री संजय पांडे तसेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची लवकरच भेट घेणार असल्याचे पावसकर यांनी सांगितले.