मुंबईत पोलीस निरीक्षकाचा हॉटेलमध्ये राडा, कर्मचाऱ्यांना केली मारहाण

मुंबई :- नुकताच काही दिवसांपूर्वी पुणे पोलीसातील एका पोलीस अधिकाऱ्याने हॉटेल चालकाकडून मोफत बिर्याणी मागवण्याचा ऑडिओ व्हायरल झाला होता. यावरून मोठा गदारोळ मजला होता. असाच काहीसा आता मुंबईतील पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडिओ वायरल झाला आहे. मोफत जेवण दिलं नाही म्हणून एका हॉटेल कर्मचाऱ्याला पोलीस अधिकाऱ्यानं मारहाण केली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फ्री प्रेस जनरलनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
या मारहाण प्रकरणी सांताक्रूझमधील वाकोला पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या विरोधात विभागीय चौकशीचे आदेश दिलेत. नेमकी घटना काय हॉटेल कर्मचाऱ्यानं मध्यरात्रीनंतर मोफत जेवण आणि दारु देण्यास पोलिसाला नकार दिला. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यानं वाकोला हॉटेलमध्ये कॅशिअरला मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
गुरुवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास वाकोला पोलीस ठाण्याजवळील स्वागत रेस्टॉरंटमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला आहे. सीसीटीव्हीत चित्रण झालेल्या व्हिडिओनुसार दिसत आहे की, हॉटेलमध्ये पोलीस अधिकारी हॉटेलच्या कॅशिअरकडे जातो. त्याचा शर्ट ओढत आहे तसंच त्याला मारहाण करत आहे असं दिसून येत आहे. या पोलीस निरीक्षकाविरोधात तक्रार आता तक्रार दाखल झाली असून या पोलीस निरीक्षकाचं नाव विक्रम पाटील असल्याचं समोर आलं आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.