ब्रेकिंग

दिलासादायक:मुंबईत कोरोना बाधितांची संख्या घटली;मृत्यू प्रमाण ही झाले कमी..

कोरोना घेतोय काढतां पाय...

मुंबई,दि.२५: मुंबईत मागील काही दिवसांपासून रुग्णांची घटत चाललेली संख्या आता अजून ही कमी होऊ लागली आहे. शनिवारी जिथे दिवसभरात ५ हजार ८८८ रुग्ण आढळून आले होते, तिथे रविवारी ५ हजार ५४२ रुग्ण आढळून आले आहेत. तर मृतांचा आकडा सत्तरीच्या खाली आला आहे. त्यामुळे कोरोना ची दुसरी लाट ओसरत असल्याची सुचिन्हे दिसू लागली आहेत.

शनिवारी दिवसभरात ७१ रुग्णांचा मृत्यू झाला होता, तर आज  रविवारी ६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याबरोबरच दिवसभरात ८ हजार ४७८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

ताजी आकडेवारी:

मुंबईत शनिवारी दिवसभरात ५ हजार ५४२ रुग्ण आढळून आले. मागील चार दिवसांपासून साडेसात हजाराच्या आसपासच रुग्ण संख्या नियंत्रणात राखण्यात महापालिकेला यश आले आहे. मात्र, रविवारपर्यंत मुंबईत ७५ हजार ७४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.. तर मृत रुग्णांचा आकडा ६४ एवढा आहे. या मृत्यू पावलेल्या रुग्णांमधील ३६ रुग्ण हे दीर्घकालीन आजाराचे आहेत. या मृतांमध्ये ३६ पुरुष व २८ स्त्री रुग्णांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यातील ५ रुग्ण हे ४० वर्षांखाली आहेत, तर ४२ रुग्ण हे ६० वर्षांवरील आहेत, तर ४० ते ६० वयोगटातील १७ रुग्ण आहेत. मुंबईतील विविध कोविड रुग्णालये व कोविड केंद्रांमध्ये २१ हजार ७०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज दिवसभरात ८,४७८ रुग्णांनी कोरोनावर मात केली. म्हणजे आढळणाऱ्या रुग्णसंख्येपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे, हे सुद्धा कोरोना हद्दपारीच्या दृष्टीने शुभसूचक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!