दुरूस्तीसाठी पंधरा ते वीस दिवस मुंबई-गोवा महामार्ग रहाणार बंद..

मुंबई:मुंबई गोवा महामार्गाच्या दुरुस्तीकरिता पंधरा ते वीस दिवस मुंबई-गोवा महामार्ग बंद ठेवला जाईल. त्यापूर्वी, या घाटाला पर्ययी मार्ग असलेला चिरणी मार्ग वाहतूक योग्य केला जाईल. या दरम्यान परशुराम घाटाचे काम वेगाने पूर्ण केले जाईल, अशी माहिती मुंबई उच्च न्यायालयाला सरकारच्यावतीने देण्यात आले.
मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे वकील व चिपळूणचे रहिवासी ऍड. ओवेस पेचकर यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. यावेळी परशुराम घाटात जेसीबी ढिगार्याखाली गाडला जावून एका कर्मचार्याच्या झालेल्या मृत्यूची घटना वाशिष्ठी नदीवरील रखडलेला पूल, पेढेतील घरावर कोसळलेला दगड या बाबी ऍड. पेचकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. न्यायालयाने कामाच्या प्रगतीबाबत नाराजी व्यक्त केली. त्यावेळी वरील आश्वासन देण्यात आले.






