मुंबई

मुंबईच्या अवस्थेला पालिका अन् सरकार जबाबदार’; विजय वडेट्टीवारांनी फटकारलं!

मुंबई – मुंबईमध्ये पावसाने थैमान घातले असून रात्रभर सुरु असलेल्या मुसळधार पावसाने मुंबईकरांची चांगलीच दाणादाण उडाली आहे. मुंबईत 300 मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. सखल भागांमध्ये पाणी साचले असून रेल्वे सेवाही विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. मुंबईच्या अवस्थेवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला चांगलेच फटकारले आहे.

मुंबईत कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईची तुंबई झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून मुंबईकरांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे. तर आता विरोधकांनीदेखील राज्य सरकारला धारेवर धरल्याचे चित्र आहे. विजय वडेट्टीवार यांनी सरकारला व्यवस्थापन जमत नाही. अपयशी सरकार अशी ओळख सरकारची निर्माण झाल्याची टीका केली आहे.

मंत्रीच अडकत असतील तर बाकीच्यांचं काय?
मुंबईच्या पावसाचा फटका सामान्य नागरिकांसह आमदार आणि मंत्र्यांनाही बसला आहे. राज्याचे मदत आणि आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटीलआणि आमदार अमोल मिटकरी यांना रेल्वे ट्रॅकवरुन चालण्याची वेळ आली. तसेच मंत्री हसन मुश्रीफ यांना देखील मुंबईच्या पावसाचा फटका बसला. यावरूनही विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, मंत्रीच अडकत असतील तर बाकीच्यांचं काय होणार? हे सरकार काहीच करु शकत नाही. अपयशी सरकार अशी ओळख निर्माण झाली असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!