महाराष्ट्रमुंबई

मत्स्यव्यवसाय विभागाच्या व्हीजन डॉक्युमेंट 2047 मध्ये सर्वसमावेशकता असावी- मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

वातावरण बदलामुळे होणाऱ्या परिणामांवर उपाय योजनांचा प्रामुख्याने समावेश असावा

मुंबई  – मत्स्यव्यवसाय विभागाचे व्हीजन डॉक्युमेंट 2047 तयार करत असताना वातावरण बदलामुळे मत्स्यव्यवसायावर होणारे परिणाम आणि त्यावरील उपाय यांचा प्रामुख्याने समावेश असावा. तसेच या व्हीजन डॉक्युमेंटमध्ये मत्स्यव्यवसायाशी संबधित भविष्याचा वेध घेणाऱ्या सर्वच घटकांचा जसे अधुनिक तंत्रज्ञान, एआचा वापर यांचा समावेश करण्याच्या सूचना मत्स्यव्यवसाय व बंदर मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.
मंत्रालयात आज व्हीजन डॉक्युमेंट 2047 विषयी बैठक संपन्न झाली. त्यावेळी मंत्री राणे बोलत होते. यावेळी मत्स्यव्यवसाय सचिव एन. रामास्वामी, मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांच्यासह मत्स्यव्यवसाय विभागातील अधिकारी उपस्थित होते. 
यंदा पावसाळा 20 दिवसच लवकर सुरू झाल्याचे सांगून मंत्री राणे म्हणाले की, यामुळे आता आणखी 20 दिवसांचा मच्छिमारांचा व्यवसाय बंद झाला आहे. तसेच विभागाचे उत्पन्नही बंद झाले आहे. वातावरण बदलाचा सर्वांधिक परिणाम हा मत्स्यव्यवसायावर होतो. 2047 पर्यंत या वातावरण बदलामुळे होणारे परिणाम आणि या परिणामांना सामोरे जाताना करावयाच्या उपाययोजना यांचा या व्हीजन डॉक्युमेंटमध्ये समावेश करताना या उपाययोजना या लोकाभिमूख असतील असे पहावे. व्हीजन डॉक्युमेंट हे वास्तवदर्शी आणि प्रयोगशील असावे. त्यासाठी जपान, इंडोनेशिया, नॉर्वे, स्विडन, इस्त्राईल या देशांसह केरळ, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांना भेट द्यावी. त्यांच्याकडे राबवण्यात येत असलेल्या प्रकल्पांचा अभ्यास करून त्यांचा राज्यात कशा प्रकारे समावेश करता येईल हे पहावे. किनारपट्टीची सुरक्षा यांचाही समावेश या व्हीजन डॉक्युमेंटमध्ये करावा. एआय तंत्रज्ञानाचा वापर, अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, मच्छिमार महिला, मच्छि बाजार यांचाही समावेश करण्यात यावा. मच्छिमारी बंदर आणि मच्छि बाजारांना अधुनिक तंत्रज्ञानाचा पुरवठा, सोलरचा वापर यांचाही समावेश या व्हीजन डॉक्युमेंटमध्ये करण्याच्या सूचना मंत्री राणे यांनी दिल्या. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!