अमोल कोल्हेंच्या ‘त्या’ सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची नाना पटोलेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पत्राद्वारे मागणी

मुंबई:- अभिनेते खासदार अमोल कोल्हे यांनी साकारलेली नथुराम गोडसे यांची भूमिका सध्या राज्यात वादाचा विषय ठरत आहे. खासदार अमोल कोल्हे यांच्या पक्षातून त्यांच्यावर टीका होत असताना आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमोल कोल्हे यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘वाय आय किल्ड गांधी’ या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. याचसोबत हा सिनेमा प्लॅटफॉर्मवर ही प्रदर्शित करण्यास प्रतिबंध घालण्यात यावा असाही उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आला आहे.
पत्रात काय लिहिले आहे?
कोणत्याही घृणास्पद अमानवीय कृत्याचं उदात्तीकरण भारतीय संस्कृतीच्या विरोधात आहे. म्हणून हा चित्रपट राज्यात कोणत्याही चित्रपटगृह व ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यास प्रतिबंध करण्याबाबत काँग्रेस पक्षाची मागणी असून, ती मान्य करण्यात यावी ही विनंती,असा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे.