कोंकणक्राइम

कुडाळ येथे भाजपा-ठाकरे गटात नारळी पौर्णिमा मिरवणुकीत राडा…

11 जणांवर गुन्हा दाखल..

सिंधुदुर्ग – कुडाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी शहरातून भाजप आणि ठाकरे गटाच्या वतीने नारळी पोर्णिमेनिमित दोन स्वतंत्र मिरवणुका काढण्यात आल्या. मिरवणूक ठाकरे गट कार्यलयासमोर आली असता भाजप आणि ठाकरे गट कार्यकर्त्यांत शाब्दिक बाचाबाची झाली आणि एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. कुडाळ येथील जिजामाता चौक आणि काळप नाका येथे सार्वजनीक ठिकाणी एकमेकांच्या अंगावर धावून जात शांतता भंग केल्याप्रकरणी भाजप आणि ठाकरे गटाच्या एकूण ११ जणांवर पोलिसांनी कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी युवा सेना उप जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट (३५), ठाकरे गट तालुका प्रमुख राजन शिवराम नाईक (५२), जिल्हा प्रमुख संजय धोंडदेव पडते (५५),संदीप सूर्यकांत महाडेश्वर(३०), अमित विजय राणे (३२) भाजपचे माजी तालुका प्रमुख विनायक देऊ राणे (५१), नगरसेवक रामचंद्र मोहन परब (४५), शेखर राणे (३०), अनंत उर्फ आबा प्रवीण धडाम (३५) सर्व राहणार कुडाळ 10) प्रसन्ना बाबाजी गंगावणे (२५) रा पिंगळी आणि आनंद भास्कर शिरवलकर (४४) रा कुडाळ तालुका कुडाळ यांच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 BNS 194(2), 221 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैकी संचयित आरोपित नंबर11 याने आपले शासकीय कर्तव्य पार पाडत असताना त्यांना अटकाव केला म्हणून वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कुडाळ ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र सहदेव कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पालवे अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!