राजकीय
मंत्रीपदाच्या माध्यमातून महाराष्ट्राला न्याय देण्याचं काम करणार -नारायण राणे

नवी दिल्ली:मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्या नंतर भाजप खासदार नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, पक्षप्रमुख जे पी नड्डा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांचे त्यांनी आभार मानले. यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे राणे यांनी सांगितले.वरिष्ठ देतील ती जबाबदारी सांभळण्यास मी तयार आहे. मी आतापर्यंत अनेक पदं भूषवली आहेत. मंत्रीपदाच्या माध्यमातून महाराष्ट्राला न्याय देण्याचं काम करणार, असेही नारायण राणे म्हणाले.