संजय राऊत यांचा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर डोळा,राऊतांनी शिवसेना संपवण्यासाठी राष्ट्रवादीकडून सुपारी घेतलीये,नारायण राणेंची राऊतांवर

मुंबई- शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषदेत भाजपवर निशाणा साधला. याच सोबत त्यांनी काही भाजप नेत्यांवर आरोप देखील केले. यानंतर आज भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र डागलं.
यावेळी नारायण राणे यांनी पत्रकारांची बोलताना,’ संजय राऊत यांचं शिवसेनेत कोणतही योगदान नाही. राऊतांनी पत्रकार परिषद घेणं थांबवावं आणि जे स्वतःवर ओढावलंय त्याला सामोरं जावं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि किरीट सोमय्या यांच्यावर त्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत.संजय राऊत यांचा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर डोळा असून राऊतांनी शिवसेना संपवण्यासाठी राष्ट्रवादीकडून सुपारी घेतली आहे.’,असे मत व्यक्त केले.
याचसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविषयी बोलताना, महाराष्ट्राच्या इतिहासातील उद्धव ठाकरे हे सर्वात लाचार मुख्यमंत्री आहेत अशी गंभीर टीका नारायण राणे यांनी केली. दरम्यान नारायण राणे यांनी केलेल्या या टीकेमुळे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचे देखील पाहायला मिळत आहे.