ब्रेकिंग
देवगड नगरपंचायत निवडणूक:शिवसेनेचा राणेंना दे धक्का!

सिंधुदुर्ग:- महाराष्ट्रात आज १०५ नगरपंचायतींपैकी ९३ नगरपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यात सगळ्यात चर्चेत असलेल्या नगरपंचायतीपैकी एक असलेल्या देवगड नगरपंचायतीचा धक्कादायक निकाल समोर आला आहे. या निकालात देवगड नगरपंचायतीतून आमदार नितेश राणे यांच्या हातून सत्ता गेल्याचे चित्र आहे.
देवगड नगरपंचायतीमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. भाजपाची सत्ता असणाऱ्या या नगरपंचायतीमध्ये शिवसेनेला ८ व भाजपाला ८ अशा समसमान जागा मिळाल्या आहेत. दोन्ही पक्षांचे प्रत्येकी आठ उमेदवार निवडून आले आहेत.
तसेच राष्ट्रवादीचा एक उमेदवार निवडून आल्यानं या ठिकाणी नक्की सत्ता कोणाची यावर शिक्कामोर्तब निकाल लागल्यानंतरही झालेलं नाही.दरम्यान आजचा निकाल नितेश राणेंसाठी धक्का असल्याचे बोलले जात आहे.