कोंकण

रत्नागिरी जिल्ह्यात आणखी पाच ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभे करणार -मंत्री उदय सामंत

रत्नागिरी,दि.३:जिह्यात जिल्हा नियोजन मंडळांमधून ६ ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभे करण्याचा निर्णय झाला होता आता मुख्यमंत्र्यांकडून आलेल्या निधीमधून पाली,रायपाटण संगमेश्वर, लांजा ,मंडणगड या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभे केले जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली रत्नागिरी जिह्यातील कोरोना परिस्थितीबाबत उदय सामंत यांनी जिल्हास्तरीय आढावा बैठक घेतली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी १८ ते ४४ वयोगटा पर्यंतच्या नागरिकांना मोफत लसीकरणाचा निर्णय जाहीर केला आहे त्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यात लसीकरण सुरू झाले आहे रत्नागिरी जिल्ह्यात अठरा ते चव्वेचाळीस पर्यंतच्या वयोगटातील नागरिकांची संख्या ६लाख ४४६ असून त्यापैकी काल आठशे लोकांना डोस  देण्यात आला आहे मात्र या वयोगटातील लसीकरण करण्यासाठी ॲपमार्फत नोंदणी करणे जरुरीचे आहे नोंदणी केल्यानंतर त्यावर येणारी वेळ व तारीख याप्रमाणे लसीकरण केंद्रावर जावे.

सोशल मिडीयावर थेट लसीकरण करण्यात येत असल्याबाबत चुकीचे मेसेज फिरत आहेत मात्र ऑनलाइन रजिस्ट्रेशन केल्याशिवाय कोणत्याही प्रकारे लसीकरण केले जाणार नाही असे सामंत यांनी स्पष्ट केले त्यामुळे लोकांनी लसीकरण केंद्रावर थेट जाऊन अनावश्यक गर्दी करू नये असेही सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले अशी गर्दी केल्याने अशी लसीकरण केंद्रे कोरोना प्रसाराची केंद्रे होऊ नयेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली १८ ते४४ या वयोगटातील लोकांची लसीकरण करण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाने घेतली असून त्यासाठी निधीची तरतूदही केली आहे मात्र लस उत्पादन करणाऱ्या कंपन्या ठराविक असल्याने लस मिळण्यावर मर्यादा येत असल्याने जशा लस उपलब्ध होतील त्याप्रमाणे लसीकरण केले जाणार आहे या गटासाठी सध्या रत्नागिरी जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर पाच तालुक्यांत अशी केंद्रे सुरू केली आहेत मात्र लस उपलब्ध झाल्यानंतर प्रत्येक तालुक्यात अशी लसीकरण केंद्रे उभी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले मात्र ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्राची असून ते यासाठी लसीकरण पुरवठा करीत आहेत मात्र नियमित पुरवठा होत नसल्याने उद्यापासून लसीकरण बंद होण्याची शक्यता आहे उद्या राज्याला या वयोगटासाठी केंद्राकडून साडेपाच लाख लस उपलब्ध होणार आहे त्यापैकी जास्तीत जास्त लस रत्नागिरी जिल्ह्याला मिळण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले तिसरी लाट येऊ नये म्हणून महाराष्ट्र प्रशासन सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले रत्नागिरी शासकीय रुग्णालयात उभारण्यात आलेला ऑक्सिजन प्लँट सुरू झाली असल्याचीही माहिती सामंत यांनी यावेळी दिली रत्नागिरी जिह्यात आरटी पीसीआर दुसर्‍या लॅबची मशनरी येत्या दोन तीन दिवसांत येणार असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!