मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूला जाणारा रस्ता खचला, तब्बल 20 फुटांचा खड्डा..

मुंबई : मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूला जाणारा रस्ता खचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवाजीहून अटल सेतूकडे जाणारा रस्ता खचला आहे. रस्त्याचा भाग थेट खाली नाल्यात पडला आहे.सुदैवाने रस्ता खचला तेव्हा कुठलीही गाडी तिथून जात नव्हती. अन्यथा मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होता. विशेष म्हणजे या रस्त्यावर तब्बल 20 फुटांचा खड्डा पडला आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. तसेच सध्या पाऊसच पडत नाही. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होते? असा प्रश्न या निमित्ताने आता उपस्थित होत आहे. संबंधित घटना ही शिवडी येथे BPT रोडवर घडल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे गेल्या चार दिवसांपासून या खड्ड्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे.
शिवडीहून अटल सेतूकडे जाणारा रस्ता खचला आहे. या रस्त्यावर तब्बल 20 फुटांचा खड्डा पडला आहे. या खड्ड्याशेजारी आता पोलिससांडून बॅरिकेटींग करण्यात आले आहे. या घटनेनंतर स्थानिक शिवसेना नेत्यांनी प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर पोलिससांडून इथे बॅरिकेड्स लावण्यात आले. सध्या हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.