मुंबई
गोकुळधाम प्रसूतीगृह येथे नवीन लसीकरण केंद्रांत लसीकरणास सुरूवात:ऊप महापौर सुहास वाडकर
मुंबई दि.७:बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पी/दक्षिण वॉर्ड अंतर्गत येणाऱ्या गोकुळ धाम प्रसूतीगृह मध्ये मुंबई चे उपमहापौर अॅड. सुहास चंद्रकांत वाडकर यांच्या उपस्थितीत नवीन लसीकरण केंद्रामध्ये काल दि.६ एप्रिल रोजी पहिली लस देण्यात आली. तरी ४५ वर्षे पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांनी या केंद्रावर येऊन या संधीचा लाभ घ्यावा व कोरोनावर नियंत्रण करण्याकरिता सहकार्य करावे, असे आवाहन ऊप महापौर सुहास वाडकर यांनी केले आहे.
वेळ :- *सकाळी ०९:०० ते सायंकाळी ०५:०० वा पर्यंत*
स्थळ :- *गोकुळधाम प्रसूतीगृह, लक्षधाम हाय स्कुल समोर, गोरेगाव (पूर्व)*
! मास्क वापरा, हात धुवा, अंतर ठेवा !!