रानटी जनावरांच्या त्रासांमुळे कोकणातील शेतकरी त्रस्त

रत्नागिरी : कोकणात शेतकरी आधुनिक शेतीकडे वळत असताना रानटी जनावरांच्या त्रासांमुळे शेतकरी त्रस्त झाले असून रानटी जनांवरांच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्यांना जागते राहाचे आवाहन केले जात आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. भात शेतीबरोबर नाचणी वरी तसेच इतर शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. नदीकाठच्या भाताबरोबर डोंगर उतारावरही शेती केली जाते. मात्र शेती करत असताना रानटी जनावरांचा त्रास सहन करावा लागत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. माकड व वानरांचा त्रास सहन करावा लागत असताना गवे व रानडुक्करांचा त्रास सहन करावा लागत आहे. रानडुक्करांचा होणारा त्रास लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी शेतात बुजगावणी उभारली आहेत. त्यामुळे काही प्रमाणात रानडुक्करांचा त्रास कमी झाला आहे. भात लोंबी वर येऊ लागली आहे. वर्षभर मेहनत करून घेतलेले पीक वाया जावू नये यासाठी शेतकऱ्यांना जागते राहाचे आवाहन केले जात आहे.