ब्रेकिंग
नितेश राणेंना आजही दिलासा नाही,आता जामीनावर सोमवारी सुनावणी होणार

सिंधुदुर्ग:- संतोष परब हल्ल्याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेले आमदार नितेश राणे यांच्या जामिनावर आता सोमवारी सुनावणी पार पडणार आहे. आज सरकारी वकील आणि तपास अधिकारी हजर न राहिल्यामुळे ही सुनावणी सोमवारी घेण्यात येणार आहे.
यावेळी सरकारी वकील आणि तपास अधिकारी यांच्या गैरहजेरीवर नितेश राणे यांचे वकील सतीश माने-शिंदे आणि संग्राम देसाई यांनी आक्षेप नोंदवला.दरम्यान न्यायालयाने नितेश राणे यांच्या वकिलांना सोमवारपर्यंत अर्जावरील मूलभूत त्रुटी पूर्ण करण्याचा वेळ दिला आहे.
त्यामुळे आता नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आणि प्रकरण वर्गीकरणावर पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.दरम्यान प्रकृतीच्या कारणास्तव नितेश राणे यांना कालपासून सिंधुदुर्ग रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.






