नितेश राणेंना कोर्टाने सुनावली १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

सिंधुदुर्ग:- शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे हे पोलीस कोठडीत आहेत.दरम्यान आज त्यांची पोलीस कोठडी संपणार होती. त्यामुळे आज कोर्टात त्यांच्या जामीनावर सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टात दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद झाला. यात पोलिसांनी नितेश राणे यांची पोलीस कोठडी वाढवून मागितली होती.मात्र,न्यायालयाने यावर निर्णय घेत नितेश राणे यांना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
नितेश राणे यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याने आता त्यांचा जामीनासाठीचा अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान १८ फेब्रुवारीपर्यंत ते न्यायालयीन कोठडीत असणार आहेत.यानंतर त्यांची जामीनावर सुटका होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे गेल्या दोन दिवसांपासून पोलीस कोठडीत असलेले नितेश राणे यांची पोलिसांनी कसून चौकशी केली आहे. गोव्यासह काही ठिकाणी नितेश राणे यांना नेऊन पोलिसांनी नितेश राणे यांची चौकशी केली.दरम्यान आज कोर्टाने निकाल देत त्यांची पोलीस कोठडी रद्द करून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.