नितेश राणेंनी उच्च न्यायालयातील जामीन अर्ज घेतला मागे,स्वत:हून होणार सरेंडर

सिंधुदुर्ग:- शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे अडचणीत आले आहेत.काल नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी जामीनासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र, आज नितेश राणे यांनी उच्च न्यायालयातील जामीन अर्ज मागे घेतला आहे.त्यामुळे आता थोड्याच वेळात आमदार नितेश राणे सिंधुदुर्ग तपास अधिकाऱ्यांकडे शरणागती पत्करणार आहेत.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांना अटकेपासून दहा दिवसांचे संरक्षण दिले आहे.नितेश राणेंनी जामीन अर्ज मागे घेतल्यानंतर एक सूचक ट्विट करत राज्य सरकारला इशारा दिला आहे.नितेश राणे यांनी ट्विट करत,’समय बडा बलवान है’ असं सूचक ट्विट केलं आहे.
यानंतर आता अगदी थोड्याच वेळात नितेश राणे कणकवली न्यायालयात हजर राहणार आहेत.याबाबतची माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी माध्यमांना दिली आहे.सध्या नितेश राणे वकिलांशी चर्चा करत असून पुढे कोणत्या प्रकारे पाऊलं उचलली गेली पाहिजेत यावर ते वकिलांचा सल्ला घेत आहेत.