गोव्यात आणि यूपीत ‘म्यँव म्यँव’चा आवाज देखील ऐकू आला नाही -नितेश राणे
आदित्य ठाकरें वर नितेश राणेंची पुन्हा खोचक टीका

मुंबई:गोवा आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांत शिवसेनेने निवडणूक लढवली होती. मात्र, या दोन्हीही राज्यांमध्ये शिवसेनेला भोपळाही फोडता आलेला नाही. यूपी मध्ये नव्हे तर किमान महाराष्ट्राच्या शेजारील गोव्यामध्येही शिवसेनेला आपले खाते खोलण्यात अपयश आलेलं आहे.गोव्यामध्ये संजय राऊत यांनी चांगली कंबर कसली होती. मात्र, तरीही गोव्यामध्ये शिवसेनेला नोटा पेक्षाही कमी मते मिळाली आहेत.
यंदाच्या निवडणुकीत संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी जोरदार व आक्रमक प्रचार केला होता. आदित्य ठाकरेंच्या सभेला मोठी गर्दी झाली, पण तेवढीच मतंही पक्षाला मिळाली नाहीत. काही ठिकाणी नोटा पेक्षा शिवसेनेला कमी मतं पडली आहेत. या साऱ्या निकालावर आता नितेश राणे यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली आहे. आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत खोचक प्रतिक्रिया दिली आहे. नितेश राणे यांनी म्हटलंय की, गोवा आणि यूपीमध्ये ‘म्यँव म्यँव’चा आवाज ऐकू आला नाही. खूपच दु:खद… अत्यंत दु:ख झालं.