गोरेगाव मिररप.महाराष्ट्रमनोरंजन
कोल्हापूरचं नाव ‘कलापूर’ करा-अभिनेते सचिन पिळगांवकर

मुंबई:आपल्या अभिनयाने चित्रपट हिंदी सृष्टी गाजविणाऱ्या प्रसिध्द अभिनेते सचिन पिळगावकर यांनी कोल्हापूरचं नाव बदलून ते ‘कलापूर’ करण्याची मागणी केली आहे., कोल्हापूर हे त्या जागेचं नाव कधीच नव्हते.. तिथे चित्रपटसृष्टी होती. तिथे कलावंत होते. सर्व प्रकारचे कलाकार तिथे असायचे. त्यामुळं त्या जागेचं नाव कलापूर होतं.
इंग्रजांनी भारतातल्या अनेक शहरांची नावे उच्चारण्यात चूक केल्याने शहरांची मूळ नावे बदलली गेली. कलापूर ला वेगळ्या पद्धतीनं उच्चारत कोल्हापूर केलं. जसं मुंबईला एवढं नाव चांगलं असताना बॉम्बे केलं. माझी इच्छा आहे की पुन्हा एकदा कोल्हापूरचं नाव कलापूर व्हायला हवं. आणि मी त्याच्यासाठी प्रयत्न करत राहणार, असं सचिन पिळगावकर म्हणाले.