कोंकण

रत्नागिरीत काजू प्रक्रिया युनिट, हवामानासाठी रडार उभारणीची मागणी

जिल्ह्यात आंबा, काजूची लागवड मोठ्या प्रमाणात

रत्नागिरी़ – जिल्ह्यात आंबा, काजूची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी शेतकरी फवारणी करतात आणि त्यानंतर पाऊस पडला की फवारणीचे लाखो रुपये वाया जातात. त्यामुळे अचूक हवामान अंदाजासाठी अत्याधुनिक रडारची उभारणी आवश्यक आहे. काजू प्रक्रिया युनिट आणि आंबा बागायतदारांची पीककर्ज व्याज माफीची मागणी आहे. तसेच देवगड व पालघर येथे मत्स्य महाविद्यालयाची आवश्यकता असल्याची मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी खासदार नारायण राणे यांच्याकडे केली.

येथील स्वयंवर मंगल कार्यालयात शनिवारी भाजपा महाअधिवेशन झाले. त्यावेळी दिलेल्या निवेदनाबाबत जिल्हाध्यक्ष श्री. सावंत यांनी सांगितले की, दक्षिण रत्नागिरीत भाजपाच्या बूथ कमिटीच्या फक्त कागदावर नाहीत, चर्चा करून केलेल्या आहेत. लोकांपर्यंत बूथप्रमुख पोहोचत आहे. आगामी सर्व निवडणुका, पक्षाचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करू. शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहोत.

रत्नागिरीत काजू प्रक्रिया उद्योग करणारी एमआयडीसी निर्माण करण्याची गरज आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध होईल. मत्स्य विभागाकडून देवगडमध्ये मत्स्य विद्यालय व्हावे, असा एका संस्थेचा प्रस्ताव पुण्यात पाठवलेला आहे. पालघरमध्येही असे कॉलेज व्हावे, अशी मागणी आहे. पुण्यामध्ये महाराष्ट्र रिसर्च कौन्सिल ऑफ द ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूट येथे प्रस्ताव आहे. तो शासनाने मागवून घेऊन दोन्ही महाविद्यालयांना परवानगी मिळावी. पर्यायाने मत्स्य अधिकाऱ्यांची संख्या वाढेल. पर्ससिननेट मच्छीमारीला ३१ डिसेंबरपर्यंत परवानगी असते. पूर्वी ती ३१ मेपर्यंत होती. ती तशी वाढवून मिळण्याची मागणीही सावंत यांनी केली. मच्छी व्यावसायिक परकीय चलन मिळवून देतो. त्यामुळे या मागणीकडे सावंत यांनी लक्ष वेधले. तसेच अनधिकृत मच्छीमारांवर कारवाई करा, असे आपण श्री. राणे यांना सांगितल्याचे सावंत म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!